भाविकांची उत्तम जाती – संत निळोबाराय अभंग – १३६४
भाविकांची उत्तम जाती ।
विश्वास धरिती संतवचनीं ॥१॥
तयां फळे त्यांचा भाव ।
प्रगटे देव हदयात ॥२॥
जाणीवेचा नाहीं फुंद ।
शुध्दबुध्द होती ते ॥३॥
निळा म्हणे त्यांची स्थिती ।
नये ते गती जाणतिया ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.