भवसिंधु त्यां पायवाट ।
मायाघाट उतरले ॥१॥
गर्जत विठोबाच्या नामें ।
गेले व्योमें निजपंथें ॥२॥
परब्रम्हा वरावरी ।
भेटले हरि विश्वात्मया ॥३॥
निळा म्हणे जोडलीं पदें ।
ब्रम्हानंदें डुल्लती ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.