भक्तांचिया गांवा आला ।
देव परमानंदे धाला ॥१॥
म्हणे नवजायें येथुनी ।
आतां भक्तांसी टाकुनी ॥२॥
शीण माझा हरला भाग ।
गोड वाटे याचा संग ॥३॥
निळा म्हणे विजयी झालें ।
देवा भक्त घेउनी आले ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.