भक्त म्हणावें तयासी – संत निळोबाराय अभंग – १३५७

भक्त म्हणावें तयासी – संत निळोबाराय अभंग – १३५७

भक्त म्हणावें तयासी ।
न गुंते जो आशापाशीं ॥१॥
अहंकार निरसिला ।
देहभाव पालटला ॥२॥
निंदा स्तुति हे नावडे ।
पाहतां परब्रम्ह आवडे ॥३॥
निळा म्हणे तया ध्यातां ।
स्वानंद तो येत हातां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भक्त म्हणावें तयासी – संत निळोबाराय अभंग – १३५७