ब्रम्हसंपत्ती वरी तया – संत निळोबाराय अभंग – १३५४

ब्रम्हसंपत्ती वरी तया – संत निळोबाराय अभंग – १३५४

ब्रम्हसंपत्ती वरी तया ।
आवडे जया संतसंग ॥१॥
त्रिकाळज्ञानी होय तो नर ।
आत्मसाक्षात्कार भोगप्राप्ती ॥२॥
शांति दया क्षमा सिध्दी ।
बोलतां समाधी चालतां त्या ॥३॥
निळा म्हणे एवढा लाभ ।
जोडे त्या स्वयंभ भागयवंता ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ब्रम्हसंपत्ती वरी तया – संत निळोबाराय अभंग – १३५४