बोलविला बोले वेद ।
म्हैसा सुबुध्द स्वरान्वयें ॥१॥
काय एक न करा देवा ।
भिंती चालवा निचेष्टिता ॥२॥
शिष्यालागीं देतां बोध ।
नलगे पलाघे निमिष्यहि ॥३॥
निळा म्हणे ज्ञानेश्वरा ।
मजहि अंगिकारा रंका दीना ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.