फळलें तया जन्मांतर – संत निळोबाराय अभंग – १३५०

फळलें तया जन्मांतर – संत निळोबाराय अभंग – १३५०

फळलें तया जन्मांतर ।
न पडे विसर नामाचा ॥१॥
अत्यादरें हरीची भक्ति ।
झाली विरक्ति विषयाची ॥२॥
कामक्रोधां गिळिलें शांति ।
अहंकार समाप्ति मदमत्सरा ॥३॥
निळा म्हणे अचिंतन ।
लागलें अनुसंधान हरिरुपीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

फळलें तया जन्मांतर – संत निळोबाराय अभंग – १३५०