यावरी कंस भयाभीत ।
कृष्णभयें उव्दिग्नचित्त ।
बैसला असतां निजमंदिरांत ।
तंव आला अकस्मात रजक बळिया ॥१॥
वस्त्रें आणिलीं घोवट ।
उंच धोऊनियां चोखट ॥
म्हणे राया राय तूं वरिष्ठ ।
शोभती विशिष्ट तुज अंगीं ॥२॥
मग ते लेवूं जों बैसला ।
तंव तो झगा पोकळ झाला ।
म्हणे थोर हा बेतियला ।
व्यर्थचि नासिला ये शिवणारें ॥३॥
राजा हांसूनि बोले त्यांसी ।
शिवणारें काय करील यासी ॥३॥
राजा हांसूनि बोले त्यांसी ।
शिवणारे काय करील यासी ।
चिंतें व्यापिलें शरीरासी ।
तेणें हें कृशत्वासीं पावलें ॥४॥
गोकुळीं नंदाचिये घरीं ।
बाळ वाडे आमुचा वैरी ।
पहा तो भाचाचि निर्धारी ।
परी मुळावरी आमुचिया ॥५॥
तया वधलियावांचून निश्रचळ नव्हे आमुचें मन ।
रजक बळिया तें ऐकोन ।
म्हणे न करी चिंता महाराजा ॥६॥
निळा म्हणे गर्वीरुढ ।
मंद बुध्दी जल्पवाड ।
म्हणे मी वारीन हें सांकड ।
एकदां डोळां मल दावीं ॥७॥