पूर्ण कृपा झाली तया – संत निळोबाराय अभंग – १३४८
पूर्ण कृपा झाली तया ।
गेलों लगटोनियां निज चरणीं ॥१॥
न देखती ते हरिविण ।
जनीं जनार्दन कोंदला ॥२॥
आनंदे त्या अळविती ।
वोसणती हरिनामें ॥३॥
निळा म्हणे देवचि झाले ।
भावा आले तयाचिया ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.