पाहोनियां सकळ मतांतरें – संत निळोबाराय अभंग – १३४७

पाहोनियां सकळ मतांतरें – संत निळोबाराय अभंग – १३४७

पाहोनियां सकळ मतांतरें ।
बैसला धुरें जाणतीयां ॥१॥
परि ते दुर्लभ निपुण ज्ञानी ।
जे कां जाणोनि नेणते ॥२॥
बोलती उदंड सारांश गोष्टी ।
परत्वीं भेटी विरळे ते ॥३॥
निळा म्हणे वरदळवेषीं ।
नुतरती कसीं तयांपुढें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पाहोनियां सकळ मतांतरें – संत निळोबाराय अभंग – १३४७