पाहोनियां आले ठाव ।
संत गांव सुखाचा ॥१॥
त्याचि दाविताती वाटा ।
सुगमा वैकुंठा जावया ॥२॥
बाळया भोळया सात्विक लोकां ।
करुनी नेटका उपदेश ॥३॥
निळा म्हणे परोपकारा ।
लागीं वसुंधरा विचरती ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.