पावले ते झाले सुखी – संत निळोबाराय अभंग – १३४५

पावले ते झाले सुखी – संत निळोबाराय अभंग – १३४५

पावले ते झाले सुखी ।
ज्यांची बोळखी संतचरणीं ॥१॥
कीटक पतंग पशु याती ।
मानव सत्संगतीं उध्दरले ॥२॥
जिहीं विश्वास धरिला पायीं ।
तरले ते डोहीं भवाब्धीच्या ॥३॥
निळा म्हणे निर्वाणरुप ।
पावले स्वरुप श्रीहरीचें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पावले ते झाले सुखी – संत निळोबाराय अभंग – १३४५