पापी आणि दुराचारी – संत निळोबाराय अभंग – १३४४

पापी आणि दुराचारी – संत निळोबाराय अभंग – १३४४


पापी आणि दुराचारी ।
सहपरीवारीं संतांच्या ॥१॥
तरले आणिक तरती पुढें ।
दिधलें येवढें सामर्थ्य त्यां ॥२॥
तुम्हीं देवा कृपावंत ।
केले निजभक्त आपणसे ॥३॥
निळा म्हणे जगदोध्दारा ।
केला हा बरा उपाय ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पापी आणि दुराचारी – संत निळोबाराय अभंग – १३४४