नित्यानंदाचिया घरा ।
विवेक पैलतीरा पावविती ॥१॥
तेचि सद्गुरु संतजन ।
निजात्मज्ञान फळदाते ॥२॥
वदनीं वसविली वेदोनीती ।
स्वधर्म स्थापिती सकळांचे ॥३॥
निळा म्हणे नेती धामा ।
वैकुंठग्रामा विश्रांती ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.