संत निळोबाराय अभंग

इंद्र म्हणे गा – संत निळोबाराय अभंग – १३४

इंद्र म्हणे गा – संत निळोबाराय अभंग – १३४


इंद्र म्हणे गा देवदेवा ।
न कळती आम्हां तुझिया मावा ।
कळसूत्रीं तें विश्रवलाघवा ।
करिसी घडामोडी स्वर्गाच्या ॥१॥
निर्मिला तुवां चतुरानन ।
आपुलिये नाभीं देऊनि स्थान ।
तुझिया सत्ता माही गगन ।
पंचमहाभूतें वाढलीं ॥२॥
तूं या आदिचिही आदी ।
विश्रवीं विश्रवात्मा तूं त्रिशुध्दी ।
तुजवांचूनियां मना बुध्दी ।
कैचें बोधव्य मंतव्य ॥३॥
तुवां अंतरिक्षी धरिलें गगन ।
तुझिया आज्ञे विचरे पवन ॥ तु‍झिया तेजें प्रकाशे रवी ।
तुझिया आज्ञे विचरे पवन ।
तुझिया सत्ता देदीप्यमान ।
सर्वदा हुताशन नवेचि ॥४॥
तुझिया तेजें प्रकाशें रवी ।
तुझिया क्षमा अचळ पृथ्वी ॥ तुझिया द्रावें सदा टवटवी ।
आपांपती गंगोदकां ॥५॥
समर्थां समर्थ तूं ईश्रवर ।
होउनी नंदाचा कुमर ।
केला पवाडा हा थोर ।
गोवर्धन उचलिला ॥६॥
आम्हीं तुझीं म्हण्यागतें ।
महिमा नेणोनियां येथें ।
पाठविलें जे पर्जन्यातें ।
त्या अपराधा क्षमा कीजे ॥७॥
कोणा नेणवे तुझी लीला ।
देवत्रयां तूं आगळा ॥ निजानंदाचा पुतळा ।
सगुणरुपीया श्रीहरी ॥ निळा म्हणे ऐशी वाडमय पूजा ।
करुनियां कृष्णा विराटध्वजा ।
आज्ञा वेउनियां अमरराजा ।
गेला आपुलिया भुवनसी ॥९॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

इंद्र म्हणे गा – संत निळोबाराय अभंग – १३४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *