नित्य कथाश्रवणीं प्रीती ।
चित्तवृत्ति अर्थातरीं ॥१॥
तेचि आधिकारीं या सुखा ।
स्वानुभव निका पावती ॥२॥
जयां बोलतां चालतां ।
एकात्मता न खंडे ॥३॥
निळा म्हणे आले घरां ।
सुख माहेरा विश्रांती ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.