नाहीं भिन्नत्व उरलें – संत निळोबाराय अभंग – १३३७
नाहीं भिन्नत्व उरलें ।
अवघ्या अंगें अवघें झालें ॥१॥
नेणती ते मानामान ।
जन तैसें तयां वन ॥२॥
न लगे साधन त्या संपत्ती ।
देवचि झाले सर्वा भूतीं ॥३॥
निळा म्हणे एकाएकीं ।
एकचि होऊनि ठेले लोकीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.