नाहीं तरि संत झकवित कोणा ।
थोर लहाना सारखेचि ॥१॥
नाहीं तेथें कानें कोचें ।
उघडया वाचें उच्चार ॥२॥
न लागे पूजनासी धन वित्त ।
एकचि चित्त भाव पुरे ॥३॥
निळा उपदेश देती ।
कानीं सांगती विठ्ठल म्हणा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.