नव्हे हे सांगितली मात – संत निळोबाराय अभंग – १३३२
नव्हे हे सांगितली मात ।
महिमाचि अदभुत सद्गुरुचा ॥१॥
जीवा जीवपणा वंग ।
तोडूनि अभंगु ब्रम्ह करी ॥२॥
आपुलीये मूळ निरासी ।
नांदवी ज्यासी हातीं धरी ॥३॥
निळा म्हणे करितां सेवा ।
ऐसिया दैवा पात्र करी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.