दृढ विश्वासें हरिसी – संत निळोबाराय अभंग – १३२७

दृढ विश्वासें हरिसी – संत निळोबाराय अभंग – १३२७


दृढ विश्वासें हरिसी ।
भजतां सायुज्यता पावले ॥१॥
ऐसे भक्त नेणों किती ।
झाले वानिती पुराणें ॥२॥
जिहीं केलें पिंडदान ।
पदीं मन प्राणेंसी ॥३॥
निळा म्हणे त्यांची कीर्ति ।
संतहि गाती कीर्तनीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दृढ विश्वासें हरिसी – संत निळोबाराय अभंग – १३२७