वासाठीं घेउनी जोग ।
अवघचि भोग त्यजियला ॥१॥
तेचि एक बळिये गाढे ।
कांपे त्यापुढें कळिकाळ ॥२॥
आशा मात्र नाहीं ज्यांसी ।
शांतिसुखासी लिगटले ॥३॥
निळा म्हणे हरीच्या ध्यानें ।
गेले विसरोन देहभाव ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.