देतां कांहींचि न घेती – संत निळोबाराय अभंग – १३२१

देतां कांहींचि न घेती – संत निळोबाराय अभंग – १३२१

देतां कांहींचि न घेती ।
भुक्ति मुक्ति रिध्दीसिध्दी ॥१॥
म्हणोनियां संकट थोर ।
वाटे दुस्तर मज यांचें ॥२॥
वैकुंठासी नेऊं म्हणतां ।
विटती तत्वतां ऐकोनि ॥३॥
निळा म्हणे रंगले रंगी ।
माझिया निजांगी लिगटले ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देतां कांहींचि न घेती – संत निळोबाराय अभंग – १३२१