देखोनियां त्याचा अंतर्भाव – संत निळोबाराय अभंग – १३२०

देखोनियां त्याचा अंतर्भाव – संत निळोबाराय अभंग – १३२०

देखोनियां त्याचा अंतर्भाव ।
वोळला देव कृपासिंधु ॥१॥
येऊनि जवळी ह्रदयीं धरी ।
आणि मुखीं भरी ब्रम्हारस ॥२॥
देऊनी विभाग आपला मान ।
करी वाढवून मान्य जगीं ॥३॥
निळा म्हणे ठाकूनि आलेला वेळ ।
आवडी गोपाळ आलिंगी त्या ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देखोनियां त्याचा अंतर्भाव – संत निळोबाराय अभंग – १३२०