जिहीं निमिषमात्रें देह पालटिला – संत निळोबाराय अभंग – १३११

जिहीं निमिषमात्रें देह पालटिला – संत निळोबाराय अभंग – १३११

जिहीं निमिषमात्रें देह पालटिला ।
स्त्रियेचाचि केला पुरुष उभा ॥१॥
त्यांचे नवल कोण तारिती जड जीवा ।
यालागीं घडावा संतसंग ॥२॥
जिहीं फिरविलें औंढयाचें देऊळ ।
बोलविले बोल मूर्तिकरवीं ॥३॥
निळा म्हणे जिहीं प्रेतें जिवविलीं ।
वरदें उपजविलीं बाळें स्त्रिया ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जिहीं निमिषमात्रें देह पालटिला – संत निळोबाराय अभंग – १३११