प्राणीमात्र पर्वतातळीं – संत निळोबाराय अभंग – १३१

प्राणीमात्र पर्वतातळीं – संत निळोबाराय अभंग – १३१


प्राणीमात्र पर्वतातळीं ।
राहिले ते निजानंद मेळीं ।
नित्य हरिकीर्तीची नव्हाळी ।
श्रवण मनन करिताती ॥१॥
सप्तअहोरात्रीवरि ।
पर्जन्यवृष्टी केली भारी ।
विजुवा कडाडिती गगनोदरीं ।
तेणे ब्रम्हांड फुटों पाहे ॥२॥
मुसळधाराखळखळाटें ।
नदियां पूर वाहति नेटें ।
पवन वातें झडझडाटें ।
पाषाण जाति उडोनिया ॥३॥
परि तया पर्वतातळीं ।
पर्जन्य वात नपवेचि बळी ।
हिंपुटी होऊनियां जवळीं ।
गेलि इद्रां सांगती ॥४॥
सप्त अहोरात्रे पाडिलों वरी ।
खाणोनि सांडिली ते नगरी ।
खडका वांचूनियां दुसरी परी ।
नुरोचि मृत्तिका ऐसें केलें ॥५॥
ऐकोनियां हरिखले सुरपती ।
बहूत मानवाला त्याचे शक्ति ।
परी गोकुळींच्या लोकांप्रती ।
नाहींची आढळला पर्जन्य वात ॥६॥
निळा म्हणे हरी दादुला ।
सकळिकां म्हणे बाहेरीं चला ।
अवघा मेघ ओसरोनि गेला ।
उन्हें पडिली खडखडाट ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

प्राणीमात्र पर्वतातळीं – संत निळोबाराय अभंग – १३१