जया नाहीं आपपर – संत निळोबाराय अभंग – १३०८
जया नाहीं आपपर ।
सांगतां विचार सवहिताचा ॥१॥
जेणें देव जोडे जोडी ।
दाविती परवडी त्या साचा ॥२॥
संदेहाचे तोडिती पाश ।
सहज उपदेश बोलणें ॥३॥
निळा म्हणे अनुताप उठी ।
ऐकतां गोठी भाविका ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.