घडो त्याचा समागम – संत निळोबाराय अभंग – १३०४

घडो त्याचा समागम – संत निळोबाराय अभंग – १३०४

घडो त्याचा समागम ।
ज्याचें प्रेम विठठलीं ॥१॥
सहज त्याच्या ऐकतां गोठी ।
परमार्थ पोटीं दृढावे ॥२॥
अनुतसपासी दुणीव चढे ।
वैराग्य वाढे चढोवढी ॥३॥
निळा म्हणे वाढे भाव ।
संचरे स्वानुभव निजांगीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

घडो त्याचा समागम – संत निळोबाराय अभंग – १३०४