गर्जत नामाच्या कल्लोळीं । आले महीतळीं उध्दरित ॥१॥ ते हे वीर वैष्णव गाढे । कळिकाळ त्यांपुढें तृणप्राय ॥२॥ वचनमात्रेंचि देती बोध । करिती अगाध सच्छिष्या ॥३॥ निळा म्हणे त्यांचिये वाणी । अमृत वोळुनी वृष्टि करी ॥४॥