गर्जता जाती ब्रम्हानंदें । हरिची पदें हरिभक्त ॥१॥ धाक त्यांचा कळिच्या काळा । कांपे चळचळां देखोनि ॥२॥ विबुध अवघे करिती मान । तीर्थें वंदन चरणाचें ॥३॥ निळा म्हणे धन्य ते जगी । झाले श्रीरंगी रंगतां ॥४॥