कैसी सांपडली वेळ – संत निळोबाराय अभंग – १२९७
कैसी सांपडली वेळ ।
तया केवळ लाभाची ॥१॥
देवचि झाले चिंत्ते वित्तें ।
गणगोतेंसहति ॥२॥
नयेचि विकल्पाचा वारा ।
त्यांचिया शरिरा आतळों ॥३॥
निळा म्हणे पहाती तेथें ।
देवापरतें न देखती ॥४॥
कैसी सांपडली वेळ ।
तया केवळ लाभाची ॥१॥
देवचि झाले चिंत्ते वित्तें ।
गणगोतेंसहति ॥२॥
नयेचि विकल्पाचा वारा ।
त्यांचिया शरिरा आतळों ॥३॥
निळा म्हणे पहाती तेथें ।
देवापरतें न देखती ॥४॥