कांहीं करी ना हा करवी । असोनि जीवीं जीवविहीन ॥१॥ संतचि ओळखती यासी । जाणतां आणिकांसी दुर्लभ ॥२॥ बुध्दीचिये पाठीं पोटी । न देखे शेवटीं बुध्दी तया ॥३॥ निळा म्हणे सत्ता याचि । न देखे विरंची आणी रुद्र ॥४॥