कांहीं करी ना हा करवी – संत निळोबाराय अभंग – १२९५
कांहीं करी ना हा करवी ।
असोनि जीवीं जीवविहीन ॥१॥
संतचि ओळखती यासी ।
जाणतां आणिकांसी दुर्लभ ॥२॥
बुध्दीचिये पाठीं पोटी ।
न देखे शेवटीं बुध्दी तया ॥३॥
निळा म्हणे सत्ता याचि ।
न देखे विरंची आणी रुद्र ॥४॥