काय त्यांचा महिमा वाणूं वारंवार – संत निळोबाराय अभंग – १२९४
काय त्यांचा महिमा वाणूं वारंवार ।
हरिभक्त थोर भूमंडळीं ॥१॥
ज्याचिये भेटीचें आर्त ब्रम्हांदिकां ।
पूज्य सकळ लोकां विश्वा झालें ॥२॥
यमधर्म वास पाहे नित्य काळ ।
म्हणे धन्य वेळ भेटती ते ॥३॥
निळा म्हणे सर्व भाग्यें चोजविती ।
रिध्दिसिध्दि येती वोळंगणे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
काय त्यांचा महिमा वाणूं वारंवार – संत निळोबाराय अभंग – १२९४