कळिच्या काळा नागवती । जिहीं विठ्ठल धरिली चित्तीं ॥१॥ तेचि देव झाले अंगे । अहंमोह ममतात्यागें ॥२॥ देहचि असोनि देहातीत । भोगीं अभोक्ते सतत ॥३॥ निळा म्हणे नामासाठीं । विठ्ठल सांठविला पोटीं ॥४॥