संत निळोबाराय अभंग

अंगी ऐश्वर्य येऊनि बाणें – संत निळोबाराय अभंग – १२९१

अंगी ऐश्वर्य येऊनि बाणें – संत निळोबाराय अभंग – १२९१

अंगी ऐश्वर्य येऊनि बाणें ।
तुमचे भक्तींचीं लक्षणें ॥१॥
तैं तो मान्य होय जगीं ।
विश्व वंदी तयालागीं ॥२॥
शांती क्षमा आलिया वस्ती ।
संतलक्षणाची प्रशस्ती ॥३॥
कामक्रोधामोडली चाली ।
सर्व भूतीं साम्यता झाली ॥४॥
तुटोन गेले आशापाश ।
नुरोनि कल्पना नि:शेष ॥५॥
निळा म्हणे नाहीं ममता ।
कृपा तुमची ते अनंता ॥६॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अंगी ऐश्वर्य येऊनि बाणें – संत निळोबाराय अभंग – १२९१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *