एकीं देव अनेकीं देव । नेणेचि भाव पालटों ॥१॥ देवचि भासे धरा मंडळ । सूक्ष्म स्थूळ महदादी ॥२॥ अन्न जीवन भूक तहान । देवचि भोजन तृप्तीचें ॥३॥ निळा म्हणे अंगें मनें । जीवे प्राणें देवचि ते ॥४॥