एका नामें बहुत तरले – संत निळोबाराय अभंग – १२८६

एका नामें बहुत तरले – संत निळोबाराय अभंग – १२८६

एका विठठलींचि ठेविला ।
जिहीं निश्चय आपुला ॥१॥
तेचि विठ्ठल झाले आता ।
मोह सांडूनियां ममता ॥२॥
देवावीण सहसा कांहीं ।
दुजें तयां उरलेंचि नाहीं ॥३॥
निळा म्हणे स्वानुभव ल्याले ।
विठ्ठल चि अंगे होऊनि ठेले ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एका नामें बहुत तरले – संत निळोबाराय अभंग – १२८६