एकनिष्ठ झाला भाव । आतां देवा तेचि अंगे ॥१॥ व्दंव्दे त्याचीं करिती काई । सर्वांठायीं देव तयां ॥२॥ ध्यानीं मनीं जनीं वनीं । प्रगटे लोचनीं अहोरात्र ॥३॥ निळा म्हणे वियोगवार्ता । नेणती सर्वथा हरिभक्त ॥४॥