एकचि वचन मानस पायीं । ठेविले नवाई काय सांगों ॥१॥ धन्य ते संत धन्य ते संत । जाणती हद्रत सकळांचे ॥२॥ दवडुनी अभिमान देवाचि देती । आणिकांही करिती आपणासें ॥३॥ निळा म्हणे अघटित चर्या । लागतांचि पायां पालटती ॥४॥