एकचि आशिर्वाद देती । जरी अवलोकिती कृपेनें ॥१॥ तरी त्या पावविती पदा । जेथें सर्वदा रमती मुनी ॥२॥ निश्चयाचें देणें त्याचें । हरिती जीवाचें जीवपण ॥३॥ निळा म्हणे अगाध वाचा । संत वरदाचा महिमा हा ॥४॥