एकचि आशिर्वाद देती – संत निळोबाराय अभंग – १२८१
एकचि आशिर्वाद देती ।
जरी अवलोकिती कृपेनें ॥१॥
तरी त्या पावविती पदा ।
जेथें सर्वदा रमती मुनी ॥२॥
निश्चयाचें देणें त्याचें ।
हरिती जीवाचें जीवपण ॥३॥
निळा म्हणे अगाध वाचा ।
संत वरदाचा महिमा हा ॥४॥
एकचि आशिर्वाद देती ।
जरी अवलोकिती कृपेनें ॥१॥
तरी त्या पावविती पदा ।
जेथें सर्वदा रमती मुनी ॥२॥
निश्चयाचें देणें त्याचें ।
हरिती जीवाचें जीवपण ॥३॥
निळा म्हणे अगाध वाचा ।
संत वरदाचा महिमा हा ॥४॥