उभारुनी बाहो ध्वज । सांगती पैज घेउनी ॥१॥ विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा । कळिकाळ आंकण मग तुम्हां ॥२॥ लहानां थोरां नारीनरां । करिती हांकारा विश्वाचिया ॥३॥ निळा म्हणे तत्वता बीज । देताती सहज निवडूनी ॥४॥