उदार ऐसा न दिसेचि दृष्टि । पाहतांहि सृष्टी मज आतां ॥१॥ जयाचीया वचनें जीवा जीवपण । नुमसेचि शीवपण शिवा अंगीं ॥२॥ अविदयेसी अर्हता मावळे । बोध भानुउजळे प्रकाशीतु ॥३॥ निळा म्हणे दावी आनंदा आनंदु । भोगवी निजानंदु निजानंदा ॥४॥