उदार ऐसा न दिसेचि दृष्टि – संत निळोबाराय अभंग – १२७७
उदार ऐसा न दिसेचि दृष्टि ।
पाहतांहि सृष्टी मज आतां ॥१॥
जयाचीया वचनें जीवा जीवपण ।
नुमसेचि शीवपण शिवा अंगीं ॥२॥
अविदयेसी अर्हता मावळे ।
बोध भानुउजळे प्रकाशीतु ॥३॥
निळा म्हणे दावी आनंदा आनंदु ।
भोगवी निजानंदु निजानंदा ॥४॥