उत्तीर्ण नव्हीजेची वेचतां जीवें । ऐसे बरवे उपकार याचे ॥१॥ सांगावें तें कोठवरी । जे जे अवसरीं जें केलें ॥२॥ वाटे तिटे घरीं दारीं । आपुल्यापरी सांभाळी ॥३॥ निळा म्हणे आपुल्या नेमा । न टळे महिमा हाचि याचा ॥४॥