उगाचि राहेन संतापासीं- संत निळोबाराय अभंग – १२७५

उगाचि राहेन संतापासीं- संत निळोबाराय अभंग – १२७५

उगाचि राहेन संतापासीं ।
सेवुनी चरणांसी निरंतर ॥१॥
पुसेन तया सांडूनी लाज ।
आपुलीये गुज अंतरींचें ॥२॥
फेडितील ते मनींची शंका ।
वचनेंचि एका क्षण्मात्रें ॥३॥
निळा म्हणे उणेंचि नाहीं ।
त्याचिये पायीं निजानंदा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उगाचि राहेन संतापासीं- संत निळोबाराय अभंग – १२७५