इंद्र चंद्र महेंद्र सर्व । मानवती देव हरिभक्तां ॥१॥ म्हणती इहींचि केला ऋणी । चक्रपाणी कीर्तनें ॥२॥ नेदि तिये वैकुंठवासी । आपणचि पाशीं गोंवियेला ॥३॥ निळा म्हणे हे सदैव सदा । कीर्तनें गोविंदा रंजविती ॥४॥