संत निळोबाराय अभंग

इंद्र चंद्र महेंद्र सर्व – संत निळोबाराय अभंग – १२७४

इंद्र चंद्र महेंद्र सर्व – संत निळोबाराय अभंग – १२७४


इंद्र चंद्र महेंद्र सर्व ।
मानवती देव हरिभक्तां ॥१॥
म्हणती इहींचि केला ऋणी ।
चक्रपाणी कीर्तनें ॥२॥
नेदि तिये वैकुंठवासी ।
आपणचि पाशीं गोंवियेला ॥३॥
निळा म्हणे हे सदैव सदा ।
कीर्तनें गोविंदा रंजविती ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

इंद्र चंद्र महेंद्र सर्व – संत निळोबाराय अभंग – १२७४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *