आले भेटी संत जन – संत निळोबाराय अभंग – १२७३

आले भेटी संत जन – संत निळोबाराय अभंग – १२७३

आले भेटी संत जन ।
गर्जे गगन हरिनामें ॥१॥
टाळ विणे मृदंग भेरी ।
छविने अंबरीं झळकती ॥२॥
विठ्ठल देव धांवती पुढें ।
भेटती कोडें जिवलगा ॥३॥
निळा म्हणे आलिंगनें ।
नव्हती भिन्न वेगळे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आले भेटी संत जन – संत निळोबाराय अभंग – १२७३