आवरुनियां ज्यांनीं चित्त । ठेविलें सतत हरीचरणीं ॥१॥ झाली त्याची कार्यसिध्दी । तुटल्या व्याधि जन्म जरा ॥२॥ एकविध भजले देवा । उतरले भव समुद्रातें ॥३॥ निळा म्हणे निश्चय पदा । पावले गोविंदा आठवितां ॥४॥